Tue, Jul 16, 2019 01:58होमपेज › Ahamadnagar › नगरसेवकाविरोधात विनयभंगाची फिर्याद

नगरसेवकाविरोधात विनयभंगाची फिर्याद

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:37AMराहाता : प्रतिनिधी 

राहाता नगरपालिकेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्यावर अल्पवयीन मुलीवर छेडछाड केल्याप्रकरणी विनयभंगाची फिर्याद राहाता पोलिसात दाखल झाली आहे.  

याबाबत राहाता पोलिसांत पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी मुलगी ही दि. 14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात जात असताना सागर लुटे याने तिला रस्त्यात अडवून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरले.  लुटे हा नेहमी माझ्या मुलीला विद्यालयात जात असताना रस्त्यात उभा राहून अश्लिल भाषेत शब्द वापरतो व भ्रमणध्वनीवरुन मॅसेज पाठवतो. माझ्या मुलीच्या मोबाईल करून तुझ्याबरोबर मला बोलायचे आहे असे वेळोवेळी म्हणतो.

तू घरी सांगितले, तर तुझे काही खरे नाही अशी दमबाजीही करतो. गेल्या एक महिन्यापासून तो त्रास देत आहे. मुलीच्या आईन दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी आरोपी लुटे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.