Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Ahamadnagar › दूध संघाची मालमत्ता विक्री कायदेशीरच : तायगा शिंदे

दूध संघाची मालमत्ता विक्री कायदेशीरच : तायगा शिंदे

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 11:48PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा दूध संघाची सावेडी (नगर)मधील 2 एकर 9 गुंठे जागा विक्रीची प्रक्रि या कायदेशीर पध्दतीने पार पडली आहे. या प्रक्रि येत कोणी हरकत आणल्यास संघाचे कर्मचारी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा संघाचे कामगार प्रतिनिधी तायगा शिंदे यांनी दिला आहे.

सहकारी संस्था (दुग्ध) सहनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य शासनाने दि.29 मे 2005 रोजी सात तालुका दूध संघाच्या मालकी हक्काची नोंद या जागेवर केली. सात ही तालुका संघ आर्थिक अडचणीत आहेत. कामगारांचे देय रक्कम थकली आहेत. कामगारांच्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्न कार्यासाठी ही रक्कम लवकरात-लवकर मिळावी, ही कामगारांची मागणी होती.  

शेख अब्दुल नासीर अब्दुल यांनी सदरची जागा ही वक्फ  मंडळाच्या मालकीची आहे, असा दावा दाखल केला होेता. 2010 या वर्षापासून जागा विक्रीस स्थगिती होती. सदरचा दावा लवकर निकाली काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी होऊ वक्फ मंडळाने चार आठवड्यात निर्णय द्यावा, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. सदरची जागा ही दूध संघाची असल्याचे निकाल मंडळाने दिला. तरीही या निर्णया विरोधात न्यायालयात हरकत घेऊन विक्री प्रक्रि येस अडथळा आणू नये, यासाठी दि.26 सप्टेंबर 2014 रोजी औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट अर्ज दाखल केला.

न्यायालयीन अडथळ्यांच्या लढाईत नगर तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्याने सहकार्य केलेले नाही. संघाच्या कर्मचार्‍यांचे देय रक्कम त्वरित द्यावी, यासाठी जागा विक्रीसाठी मंत्री, प्रशासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना यश आले. राज्यातील प्रमुख खपाच्या दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविण्यात आल्या. सर्व कायदेशीर प्रक्रि येनंतर दि.9 फेब्रुवारी 2018 रोजी निविदा उघडण्यात आली. साई मीडास रियालिटीज, सावेडी रस्ता, नगर यांची निविदा तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. साई मीडासने 27 कोटी 11 लाखांना ही जागा खरेदी तयारी दर्शविली. निविदेतील अटी व शर्ती क्र मांक 12 नुसार सदर व्यवहार पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.

या मुदतवाढीस इतर निविदाधारकांनी हरकत घेतलेली नाही. तालुका दूध संघाचे पुर्नजीवन समिती सदस्य व बाणेश्‍वर दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले यांनी या व्यवहाराला घेतलेले आक्षेप धांदात खोटे व तथ्यहिन आहेत. या प्रक्रियेमध्ये कोणीही अडथळा आणल्यास संघाचे कर्मचारी उपोषण, आंदोलन, मोर्चे आदी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.