Wed, Nov 21, 2018 13:17



होमपेज › Ahamadnagar › देशाच्या अखंडत्वासाठी जवानांनी कायम सर्तक रहावे : मेजर जनरल चौहान

१९५ जवानांचा शपथविधी

Published On: Jul 22 2018 1:03AM | Last Updated: Jul 22 2018 12:03AM



नगर : प्रतिनिधी

देशाचे ऐक्य, अखंडत्व कायम राखण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. जाती, धर्म, वंश यापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन लष्कराचे मेजर जनरल अजय चौहान यांनी केले. 

लष्कराच्या नगर येथील मॅकेनाईज्ड इन्फ्र र्टी रेजिमेंटल सेंटर (एम.आय.आर.सी.) 195 प्रशिक्षणार्थी जवानांच्या शपथविधी अखोरा ड्रिल मैदानावर शनिवारी (दि.21) पार पडला. याप्रसंगी मेजर जनरल चौहान बोलत होते. एमआयआरसीचे कमांडिंग बिग्रेडिअर व्ही.लक्ष्मण सुब्रम्हणम, कर्नल रसेल डिसुझा तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.36 आठवड्यांच्या कठोर परिश्रमानंतर आज खर्‍या अर्थाने लष्करात दाखल झालेल्या या जवानांनी तिरंगी ध्वजाच्या साक्षीने आपल्या धर्माच्या धर्मग्रंथावर हात ठेऊन राष्ट्रसेवेची शपथ घेतली. या शपथग्रहण सोहळ्यानंतर या जवानांनी शानदार संचलन करून मेजर जनरल अजय चौहान यांना मानवंदना दिली.

मेजर जनरल चौहानम्हणाले, देशाच्या दृष्टीने लष्कर हे अत्यंत महत्वाचे असते. बाह्य शक्‍तींपासून देशाचे संरक्षण करण्याबाहेरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस सैन्य दलाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. भूकंप, पूर या नैसर्गिक संकटाच्या वेळेस सैन्य दलाची भूमिका महत्वाची राहिली आहे. देशाची एकाता, अखंडता कायम राखली पाहिजे. जात, धर्म, वंश यापेक्षा देश हिताला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

आपल्या सैन्य दलाला उज्ज्वल परंपरा आहे. विविध देशांमध्ये शांती सेनेच्या माध्यमातून सैन्य दलाने मोठे कार्य केले आहे. या परंपरेला साजेशे वर्तन असले पाहिजे. प्रत्येक सैनिकावर तो कार्यरत असलेल्या युनिटची प्रतिष्ठा ठरत आहेत. सैनिकाचे वर्तन हे शिस्तप्रिय व आदर्श असले पाहिजे. सैन्य जीवनाबरोबरच समाजामध्ये ही एक आदर्श व्यक्‍ती म्हणून वर्तन राहिले पाहिजे.

प्रशिक्षणादरम्यान ज्या जवनांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यातील बलविंदर सिंग यांना जनरल सुंदरजी यांच्या नावे दिल्या जाणार्‍या सुवर्णपदकाने तर बलराज सिंग यांना जनरल डिसुजा रजत पदकाने आणि गजेंद्रसिंग यांना जनरल पंकज जोशी कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले.आली. शपथविधीनंतर जवानांनी शहीद स्मारकास अभिवादन केले. जवानांच्या कुटुंबीयांचा मेजर जनरल चौहान यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.