Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Ahamadnagar › मटका बुकी जाधवसह चौघे हद्दपार

मटका बुकी जाधवसह चौघे हद्दपार

Published On: Mar 25 2018 1:44AM | Last Updated: Mar 24 2018 11:15PMनगर : प्रतिनिधी

नगरचा कुख्यात मटका बुकी व नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजूमामा ऊर्फ राजू जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील आणखी तिघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी याबाबतचा आदेश जारी केला आहे. 

हद्दपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख राजू दत्तात्रय जाधव (रा. जंगुभाई तालमीजवळ, तोफखाना), जगदीश वामन वाकोडे (रा. सिव्हिल हडको), संजय रामचंद्र पेठकर (रा. सातपुते तालमीजवळ, तोफखाना), विजय गंगाराम गवळी (रा. निलक्रांती चौक, नगर) यांचा समावेश आहे.

जाधव याचा अनेक वर्षांपासून शहरातील अवैध धंद्यात कार्यरत आहेत. मटक्यासह जुगाराचे त्याच्याविरुद्ध 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मटका धंद्याविरुद्ध छापे टाकल्यानंतर त्यांना तात्काळ जामीन मिळण्याची तरतूद असल्याने कारवाईनंतरही त्यांच्या व्यवसायावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी टोळीप्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. टोळीचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आलेला होता. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तो चौकशीसाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याकडे होता. चौकशी पूर्ण करून शिंदे यांनी सदर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी टोळीप्रमुख जाधव व टोळीतील आणखी तिघांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. 

Tags : ahmednagar, Mattaka Bukki Jadhav,  with Four,