Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Ahamadnagar › शहिदाची पत्नी शासकीय सेवेत

शहिदाची पत्नी शासकीय सेवेत

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 10 2018 12:07AMमढी : वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगावचे सुपुत्र शहीद पोलिस नाईक दीपक कोलते यांच्या पत्नी तृप्ती कोलते यांची शालेय शिक्षण विभागाअंतर्गत तत्सम पदाच्या अनुकंपा तत्वावर पाथर्डीच्या उपशिक्षणाधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस मेले कुणाचे काय गेले, या मथळ्याखाली दैनिक पुढारीने मांडली होती कुटुंबीयांची व्यथा. 

शहीद पोलिस नाईक दीपक कोलते यांचा शेवगाव तालुक्यात गुन्हेगारांशी लढताना 3 मे 2015 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आ. मोनिकाताई राजळे यांनी घेतली. तसेच शासनास शासनाकडून तीस लाख रुपयांची मदत मिळवून दिली. तसेच वीरपत्नी तृप्ती कोलते यांची शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन गृह विभागाच्या संदर्भाधीन शासननिर्णयानुसार शिक्षण विभागातील गट ब संदर्भात सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे सादर केला.

त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम आ. राजळे यांनी केले. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन) सवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर या आदेशाने दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,  युवा नेते रवींद्र वायकर यांच्यासह माळीबाभूळगाव ग्रामस्थांनी पाठपुरावा  केला.