होमपेज › Ahamadnagar › कोळपेवाडी येथे पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन

कोळपेवाडी येथे पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 10:48PM

बुकमार्क करा
कोळपेवाडी : वार्ताहर

माजी केंद्रीयमंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या गुरुवार दि. 14 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7 वा. भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरगाव यांच्यावतीने देण्यात आली आहे. 

या स्पर्धेसाठी प्रवेश मोफत असून सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत मुलींसाठी इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत 3 किमी अंतर ठेवण्यात आले आहे. इयत्ता 8 वी ते 10 वीच्या मुलांसाठी 5 किमी अंतर व खुल्या गटासाठी 10  किमी अंतर ठेवण्यात आले अशडे. या स्पर्धेत फक्त  कोपरगाव तालुक्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकणार आहे. 

या स्पर्धेसाठी रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक 3 हजार 1 रूपये व चषक, द्वितीय पारितोषिक 2 हजार 1 रूपये व चषक, तृतीय पारितोषिक 1 हजार 1 रूपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 701 रूपये व चषक, पाचवे पारितोषिक 501 रूपये व चषक विजेत्या स्पर्धेकांना देण्यात येणार आहे. 

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरगाव, कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्यावतीने करण्यात आले आहे.