Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षण आंदोलन : एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोन गुन्हे

मराठा आरक्षण आंदोलन : एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोन गुन्हे

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 10:26PMशेवगाव ः प्रतिनिधी 

शेवगाव शहरात मराठा आरक्षण आंदोलनात नुकसान केल्याप्रकरणी आंदोलकावर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

मराठा आरक्षणसाठी कायगाव येथे गोदावरी नदीपात्रात काकासाहेब शिंदे याने जलसमाधी घेतल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक होऊन ठिकठिकाणी हिंसाचार उसळला आहे. मराठा आरक्षण मुद्यावर शेवगाव शहरात दि.24 रोजी कडकडीत बंद पाळून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. नेवासा-शेवगाव ही बस वाहतूक कोंडीतून शेवगाव बसस्थानकात जात असताना काही आंदोलकांनी दगडफेक करून बसचे नुकसान केले. या दगडफेकीत महिला वाहक किरकोळ जखमी झाल्या. 

याबाबत शेवगाव पोलिसांनी रस्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी तुषार पुरनाळे, राजेंद्र झरेकर, उमेश भालसिंग, मुन्ना बोरुडे, विष्णू घनवट, सर्जेराव तानवडे, बंटी पन्हाळे व इतर 200 ते 250 आंदोलकावर गुन्हा दाखल केला आहे. बसच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी  निखील गायकवाड व इतर 4 ते 5 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.