कर्जत : प्रतिनिधी
महाराष्ट्राची भूमी ही थोर पुरुषांची म्हणून ओळखली जाते. या भूमीने समतेची शिकवण देशालाच नव्हे, तर जगाला दिली, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने अभिनव युवा प्रतिष्ठान व भास्कर भैलुमे मित्रमंडळातर्फे मिटकरी यांचा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते..
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिटकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिका, चांगले वागा आणि जिंका, असा संदेश सर्वाना दिला. हाच वारसा पुढे चालवताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश सर्वांना दिला. या पवित्र अशा मातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कलेले कार्य हे कोणीच विसरू शकत नाही. अशा अनेक सत्पुरुषांचे कार्य हीच खरी आपली सर्वांची प्रेरणा आहे. स्त्रियांबद्दल आदर आणि समानतेची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रथम दिली. समाजातील गरिबांना एकत्र करून समतेसाठी आयुष्य वेचेले ते डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांनी. सर्वांनी एकत्र या जातीच्या व अंधश्रद्धेच्या भिंती पाडून टाका, असे आवाहन मटकरी यांनी यावेळी केले. कार्यक्रम संपल्यानंतर मुस्लिम समाजातर्फे मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला.
Tags : Ahmadnagar, Maharashtra, equality, education, land, Mithkari