होमपेज › Ahamadnagar › ...अन भुजबळांना अश्रू अनावर ! 

...अन भुजबळांना अश्रू अनावर ! 

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 09 2018 11:34PMअकोले : प्रतिनिधी

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंगळवारी सायंकाळी माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांची मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा आ. भुजबळ यांनी गळाभेट घेत पिचड साहेब, तुम्ही पहिल्या विनिंगला माझ्याबरोबर होता. सेकंड विनिंगही तुमच्याबरोबर लढू, अशी इच्छा व्यक्त करताना भुजबळांना अश्रू अनावर झाले.

मंगळवारी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी आ. भुजबळ यांची के.ई.एम.रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ यांनी तुरुंग प्रशासनाने आपल्याला कसा त्रास दिला. आपल्याला यात कशा प्रकारे अडकविले ? याचे सर्व कथन केले. तसेच त्यांना हे सर्व सांगताना आपली प्रकृती कशी खालावत गेली. स्वादूपिंडाच्या त्रासाने कसे ग्रासले हे सांगताना अश्रू आवरता आले नाही. पिचड यांना पाहिल्यावर भुजबळ यांचे डोळे पाणावले होते. पिचड यांच्या बरोबरच्या सर्व आठवणींना भुजबळ यांनी उजाळा दिला. 

या देशाला शरदचंद्र पवार यांच्या सारख्या नेत्याची गरज असून त्यांचा पाय मुरगळला आहे. तरी पण ते शेतकर्‍यांसाठी बाहेर फिरत आहेत. त्यांना माझा निरोप द्या की, थोडा आराम करा. फिरू नका. आज ते सोडून देशाला तारणारा कोणीही नेता नाही, असे भावना विवश होऊन भुजबळ बोलत होते.