Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Ahamadnagar › नगर : भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नगर : भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Published On: Apr 12 2018 12:26PM | Last Updated: Apr 12 2018 12:27PMनगर : प्रतिनिधी

लोकसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या विरोधामुळे अवघे ४८ तास काम झाले. दोन्ही सभागृहाचे २४८ तास वाया गेल्याचा आरोप करत भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, राहुल रासकर, महिला आघाडीच्या गीतांजली काळे, नगरसेविका मनीषा बारस्कर, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, मालन ढोणे आदी सहभागी झाले आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्‍वाचे असते. त्यात सातत्याने गोंधळ घालून विरोधकांनी त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले.

याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. तर भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटकात उपोषणास बसले आहेत. भाजपने आज देशभर आत्‍मक्‍लेष आंदोलन केले आहे. त्यासाठी सर्व भाजप खासदार आपआपल्या मतदार संघात उपोषणास बसले आहेत. 

Tags : dilip gandhi, BJP, nagar, nagar news, fast against Parliament disruption