Sat, Jan 19, 2019 15:50होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांड प्रकरणी आमदार जगताप यांना जामीन

केडगाव हत्याकांड : आमदार जगताप यांना जामीन

Published On: Jul 07 2018 12:57PM | Last Updated: Jul 07 2018 1:01PMनगर : प्रतिनिधी

केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना प्रत्येकी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीआरपीसी 167 (2) नुसार 5 वे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस एस पाटील यांच्या कोर्टात वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीदरम्यान जामीन मंजूर करण्यात आला.

वाचा : दुहेरी हत्याकांडापासून ते दोषारोपपत्रापर्यंत!

केडगाव हत्याकांड गुन्हा गंभीर असल्याने आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, ९० दिवसात दोषारोपपत्र दाखल न झाल्याने आरोपींना जामीनाचा अधिकार असल्याचे म्हणणे आमदार जगताप यांच्या वकिलांनी मांडले. साक्षीदारावर दबाव टाकू नये, तपास यंत्रणेला मदत करावी, तपासी अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावल्यानंतर हजर राहावे या अटी ठेवत न्यायालयाने जामीन मंजूर केला.