Tue, Mar 26, 2019 01:43होमपेज › Ahamadnagar › ‘गोपीनाथ मुंडे असते तर कॅबिनेट मंत्री असतो’

‘गोपीनाथ मुंडे असते तर कॅबिनेट मंत्री असतो’

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 6:11PMकरंजी : वार्ताहर

गोपीनाथ मुंडे असते, तर पहिल्या रांगेत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असती, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.मेहेकरी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या 75 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन  राहुल जगताप यांच्या हस्ते व आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सद‍्गुरू संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज कराड उपस्थित होते.

वाचा : ‘स्वाभिमान’ गहाण; ‘रयत’ देशोधडीला

आमदार कर्डिले म्हणाले राज्यात व देशात सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, लोकनेते गोपीनाथ मुढे यांच्या विश्वासामुळेच राहुरी मतदारसंघातून आमदार होता आले. मुंढे असते, तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती. मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातूनही भरीव विकास निधी मिळत असल्याचे समाधान आहे. विकासकामे व सर्वसामान्य जनतेच्या पाठबळामुळे निवडणुकांना घाबरत नाही. काही नेतेमंडळी निवडणुका जवळ आल्यावर मतदारसंघात फेरफटके मारू लागतात. 

वाचा : ‘उपमहापौर’साठी भाजपचा उमेदवार नाही?

जगताप म्हणाले नगर तालुक्याने बोलबच्चन करणार्‍या पुढार्‍यांना घरी बसविले आहे. मी विकासकामांत दिलेला शब्द पाळण्याचे काम नेहमीच केल आहे. मेहकरी येथील सद‍्गुरू देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत क वर्गात समावेश करण्यासाठी प्रयत्न करील. नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, रेवणनाथ चोभे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक बाबा खर्से, बन्सी कराळे, दीपक लांडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

कर्डिले गुरू : आमदार जगताप

शिवाजीराव कर्डिले माझे राजकीय गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मला यश आले. ते बरोबर असताना अपयश येणे अशक्य आहे, असे आमदार राहुल जगताप यावेळी म्हणाले.