Tue, Feb 19, 2019 11:12होमपेज › Ahamadnagar › जलयुक्तमुळे सिंचन क्षेत्रात वाढ

जलयुक्तमुळे सिंचन क्षेत्रात वाढ

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 10:55PM

बुकमार्क करा

करंजी  : वार्ताहर

राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेमुळे शेतकर्‍यांच्या सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सातत्याने पडणार्‍या दुष्काळावर मात्र मात केली आहे. त्यामुळे ही योजना निश्चितपणे शेतकर्‍यांच्या फायद्याची ठरली असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील शिराळ, गितेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर होते.  

आ कर्डिले यांच्या हस्ते शिराळ येथे चार काँक्रीट बंधार्‍याचे भूमिपूजन व गितेवाडी येथे साठ लाख रुपये खर्चाच्या बंधार्‍याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते पुरूषोतम आठरे, पं.स , सदस्य सुनिल परदेशी, युवानेते वैभव खलाटे, सरपंच संतोष शिंदे, बाबाजी पालवे, महादेव कराळे, जिजाबापू लोंढे, पोपटराव कराळे, महादेव गीते, सुरेश चव्हाण, रावसाहेब वांढेकर, अशोकराव दहातोंडे , प्रमोद गाडेकर , रामेश्वर फसले, सुखदेव जाधव , बाळासाहेब लवांडे , कैलास गिते , बापू गोरे , रामदास गोरे , डॉ. गोरक्ष गिते, डॉ. रामेश्वर गिते , पोपटराव आव्हाड , विष्णू गंडाळ, जलयुक्तचे शाखा अभियंता कुमकर , मुळा विभागाचे उपअभियंता भगत, शाखा अभियंता पवार, ठेकेदार भगवान दराडे यांच्यसह  ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.