Thu, Aug 22, 2019 10:41होमपेज › Ahamadnagar › मेधा महोत्सवातून कलागुणांना वाव

मेधा महोत्सवातून कलागुणांना वाव

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:31PM

बुकमार्क करा
संगमनेर : प्रतिनिधी

विद्यार्थांना अभ्यासाव्यतिरिक्त  त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी मेधा महोत्सवासारखे सांस्कृतिक उपक्रम निश्‍चितच उपयोगी ठरतील, असा आशावाद माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी मेघा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने आयोजित मेधा-2018 या सांस्कृतिक युवा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिंदी हास्य कवी डॉ. मुकेश गौतम, ऑलम्पिकपटू दत्तू भोकनळ, अभिजित पवार, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, राजवर्धन थोरात, शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्रा. व्ही. बी धुमाळ, प्रा. ए. के. मिश्रा आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की , अमृतवाहिनी संस्थेने तालुक्याच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयातून अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशांत कार्यरत आहेत. यातच या संस्थेचे मोठेपण असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ हास्य कवी डॉ. मुकेश  गौतम म्हणाले की, विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ही संतांची व वीर पुरुषांची भूमी आहे. येथे ढोंगीपणाला थारा नाही. अनेक राज्यांत अंधश्रद्धेमुळे ढोंगी बाबांचे पेव फुटले आहे. मात्र, महाराष्ट्रात वैचारिक अधिष्ठानामुळे तसे झाले नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त करीत युवकांनी सोशल मीडियात वेळ न घालवता योगी होण्यापेक्षा उपयोगी व्हा. वेद वाचण्यापेक्षा इतरांच्या वेदना वाचा. रस्त्याचे नाव बदलण्यापेक्षा महापुरुषांनी दाखविलेल्या रस्त्यावरून चला, असा सल्ला त्यांनी दिला.  प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख प्रा. जी. बी. काळे, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर उपप्राचार्य ए.के.मिश्रा यांनी आभार मानले.