Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › लव्ह जिहाद करणार्‍यांची आर्थिक कोंडी करा : राजासिंह

लव्ह जिहाद करणार्‍यांची आर्थिक कोंडी करा : राजासिंह

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 12:07AM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

भारतात लव्ह जिहादसाठी पाकिस्तानमधून पैसा पुरविला जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी आपल्याच देशातील तरुणांना संघटित होऊन याविरोधात उभे राहावे लागणार आहे. यासाठी गोहत्या करणारे आणि लव्ह जिहाद करणार्‍यांची आर्थिक कोंडी करून धडा शिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे. यापुढे आता हिंदू युवक बलिदान देणार नसून, राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍यांचा बळी घेणार असल्याचे वादग्रस्त विधान श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष तथा आमदार टी. राजासिंह यांनी केले.

धुळ्यात गिंदोडिया कंपाऊंडमध्ये हिंदू जनजागरण समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.  सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, समितीचे संघटक सुनील घनवट, रणरागिणी समितीच्या क्षिप्रा जुवेकर व्यासपीठावर होते. तर मेळाव्यास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. ठाकूर यांनी, एमआयएमचे अध्यक्ष ओवैसींवरही टीका केली. हिंदू जनतेने आता गोहत्या करणारे तसेच लव्ह जिहाद करणार्‍या समुदायाकडून एका रुपयाची वस्तूदेखील खरेदी करू नये. आमच्या समुदायाच्या पैशांमधून जगणारे आमच्याच भगिनींवर वाकडी नजर ठेवणार असतील, तर त्यांची आर्थिक कोंडी करून त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे. याशिवाय लव्ह जिहाद थांबणार नाही, असे ते म्हणाले.