Thu, Jul 18, 2019 12:17होमपेज › Ahamadnagar › प्रेमप्रकरणातून युवतीला जाळले

प्रेमप्रकरणातून युवतीला जाळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

प्रेमप्रकरणातून भिंगारमधील युवतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. तिला उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते. औषधोपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काल (दि. 31) कँप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी सागर लक्ष्मण फुलारी (रा. नेहरू चौक, भिंगार) अटक करण्यात आलेली आहे. 

ऐश्‍वर्या मोहन बिलरवाण (रा. भिंगार टेकडी) हे मयत युवतीचे नाव आहे. बुधवारी (दि. 27) नेहरू चौकातील आरोपीच्या घरी ही घटना घडली होती. याबाबत ऐश्‍वर्या यांनी पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ऐश्‍वर्या व सागर या दोघांचे सुमारे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी सागरे याचे दुसर्‍या मुलीसोबत लग्न झाले आहे. 27 मार्च 2018 रोजी ऐश्‍वर्या या सागर याच्या घरी गेल्या. ‘तू मला लग्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. मला न सांगता लग्न का केले’, अशी विचारणा ऐश्‍वर्या यांनी केली. याचा राग सागर याला आला. तो घरात गेला व पेट्रोलची बाटली घेऊन बाहेर आला. ऐश्‍वर्या यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. 

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह भिंगार कँप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला जखमी ऐश्‍वर्या यांनी पोलिसांना जबाब दिला होता. त्यावरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी सागर फुलारी याला अटक केली. जखमी ऐश्‍वर्या हिला उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी बुधवारी (दि. 28) फरासखाना पोलिसांना जबाब दिला.

‘सुरुवातीला भाजलेल्या अवस्थेत असल्याने मला काही समजले नाही. त्यामुळे कँप पोलिसांना खोटा जबाब दिला होता. आता खरा जबाब देत असून सागर फुलारी याने पेटवून दिल्याचे दिले’, असे सांगितले. त्याची कागदपत्रे नगरला येण्यापूर्वीच शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कँप पोलिसांनी शनिवारी (दि. 31) सकाळी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविले. सागर फुलारी याच्याविरुद्ध खून, अ‍ॅस्ट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून, त्याला बुधवारी ऐश्‍वर्या यांनी पेटवून घेतले त्यादिवशीचअटक केलेली होती. शनिवारी सागर याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हे करीत आहेत.

पोलिस ठाण्यावर वाल्मिकी समाजाचा मोर्चा

ऐश्‍वर्या यांचा खून करणार्‍या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी,  या मागणीसाठी वाल्मिकी समाजाच्यावतीने शनिवारी दुपारी कँप पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. नगरसेवक दीप चव्हाण यांनी पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी सबळ पुरावे तयार करून दोषारोपपत्र तयार करण्यात येईल, असे आश्‍वासन सहाय्यक अधीक्षक शिंदे व सहाय्यक निरीक्षक पाटील यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, crime, Love Case, girl, Burn,


  •