Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : अनैसर्गिक अत्याचार करून साडेदहा लाखाची लूट

अहमदनगर : अनैसर्गिक अत्याचार करून साडेदहा लाखाची लूट

Published On: Apr 29 2018 9:00PM | Last Updated: Apr 29 2018 9:00PMअहमदनगर : प्रतिनिधी

अनैसर्गिक अत्याचार करून साडेदहा लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. नागापूर शिवारातील इंडियन ऑईलच्या पाठीमागे निर्जनस्थळी २१ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेबाबत शनिवारी (दि. २८)  सायंकाळी गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये मोहसीन सय्यद, जुबेर सय्यद (दोघे रा. मुकुंदनगर, नगर) यांचा समावेश आहे. दोघांनाही २ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. समद सय्यद, शाहनजीर कुरेशी, वसील टकला, समीर कुरेशी, शाहरूख (पूर्ण नाव समजू शकले नाही, सर्व रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे), हमीद (पूर्ण नाव समजू शकले नाही), बिंद्री व त्याचे दोन साथीदार, नवनाथ (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. लोणी फाटा, पुणे) हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

उत्तरप्रदेशातील एक जण १९ एप्रिल रोजी पंजाब येथून ११२ बकरे मालमोटारीत भरून कराडला निघाला होता. २१ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मालमोटार आरामसाठी नगरला थांबविली. नगर एमआयडीसी भागातील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या मागे निर्जनस्थळी ट्रक नेली. तेथे शेळ्या आरामासाठी उतरविल्या. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता डॉ. मोहसीन सय्यद व इतर ११ जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी लाकडी बॅट, काठी, चाबकाने बेदम मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर १० लाख ५० हजार रुपयांच्या बकर्‍या चोरण्यात आल्या.