होमपेज › Ahamadnagar › झेंडीगेटचे तीन कत्तलखाने उद्ध्वस्त

झेंडीगेटचे तीन कत्तलखाने उद्ध्वस्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

झेंडीगेट परिसरातील तीन कत्तलखान्यांवर छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 53 गोवंशीय जनावरांची सुटका केली व तेराशे किलो गोमांस हस्तगत केले आहे. या कारवाईत एकूण 7 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 6 जणांना अटक करण्यात आली असून, 6 जण फरार आहेत. काल (दि. 29) सकाळी हे छापे टाकण्यात आले. प्रशिक्षित श्‍वानाच्या मदतीने कत्तलखान्यांचा माग काढण्यात आला.

अटक केलेल्यांमध्ये सलीम बुढण कुरेशी (वय 50, रा. सदर बाजार, भिंगार), इजाज अहमद कुरेशी (वय 45, रा. हातमपुरा, नगर), आरिफ शब्बीर कुरेशी (रा. 40, रा. नालबंदखुंट), शकील बाबासाहब कुरेशी (वय 32, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट), जाकीर खलील कुरेशी (वय 35), अकील जलील कुरेशी (वय 30, दोघे रा. झेंडीगेट) यांचा समावेश आहे. रशीद अब्दुल अजिज शेख ऊर्फ रशीद दंडा (रा. झेंडीगेट), शब्बीर अम्मू कुरेशी (रा. पारशाखुंट), मुश्ताक हसन कुरेशी , मुबीन मुश्ताक कुरेशी, जयाज शब्बीर कुरेशी, मुन्ना बाबु कुरेशी (सर्व र. बेपारीमोहल्ला) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यांची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा झेंडीगेट परिसरात गेला. तेथील झेंडीगेट येथील गैबीपीर दर्ग्याच्या पाठीमागे, ए. वन. टी स्टॉल शेजारी व सैदु कारंजा मश्जिदजवळ अशा तीन ठिकाणच्या कत्तलखान्यांवर छापे टाकून 53 जनावरांची सुटका केली, तर तब्बल तेराशे किलो गोमांस जप्त केले. 6 जण पोलिसांच्या हाती लागले, तर 6 जण पोलिस आल्याचे समजताच पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली.

Tags : Ahmadnagar, Ahmadnagar News, Local crime branch, squad, released, 53 , cattle


  •