Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Ahamadnagar › पशुधन पर्यवेक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पशुधन पर्यवेक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:34PMकर्जत : प्रतिनिधी 

कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील डॉ. केशव साहेबराव पुराणे (वय 52)  यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) रात्री घडली. ते पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील चापडगाव येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.  याबाबत त्यांचे बंधू गंगाधर साहेबराव पुराणे (रा. बाभूळगाव खालसा, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीनुसार मिरजगाव पोलिस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, असा परिवार आहे.

रात्री डॉ. पुराणे हे त्यांचा शेतातील राखणदार नसल्यामुळे घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील शेडमध्ये झोपण्यासाठी गेले होते. पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे गायींची धार काढण्यासाठी गेला असता, त्याला शेडच्या लोखंडी गजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत डॉ. पुराणे यांचा मृतदेह दिसला. या वेळी त्याने चुलते गंगाधर व मामेभाऊ पंडित पुराणे यांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. दुपारी डॉ. पुरणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Tags : ahmednagar news, Livestock, Supervisor, Suicide,