Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Ahamadnagar › कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या  

कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या  

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 10:17PM

बुकमार्क करा
संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील  पोखरी बाळेशवर गावच्या तळेवाडी  येथील भाऊसाहेब फटांगरे या शेतकर्‍याच्या घराजवळ कोंबड्यांच्या खुराड्यात  बिबट्या  अडकल्याची  घटना गुरूवारी रात्री साडेनऊ  वाजेता घडली.

संगमनेर तालुक्याच्या ज्या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात  आहे, त्या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. मात्र, तालुक्याच्या  पठार भागात उसाचे क्षेत्र नसताना देखील  भागात आता बिबट्याचा  वावर वाढला आहे. काही दिवसांपासून बिबट्याने या भागातील शेतकर्‍यांची रात्रीची झोप उडवली आहे. त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शेतकर्‍यांनी वनविभागाचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, भक्ष्याच्या शोधात फिरणारा नर जातीचा बिबट्या  पोखरीबाळेशवर गावच्या नजीक असणार्‍या तळेवाडी येथील  भाऊसाहेब फटांगरे या शेतकर्‍याच्या घराजवळ कोंबड्यांचा खुराड्यात  अलगद  अडकला. ही बाब फटांगरे यांच्या रात्रीच लक्षात आली. त्यांनी हि माहिती वन विभागाला दिली.   काल शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या बिबट्यास खुराड्यातून काढून चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात पाठवले होते.