Fri, Apr 26, 2019 04:00होमपेज › Ahamadnagar › बिबट्या आढळला मृतावस्थेत

बिबट्या आढळला मृतावस्थेत

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 13 2018 11:45PMकान्हूरपठार : वार्ताहर

कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे काल (दि.13) दुपारी मुक्तीधामजवळील खासगी क्षेत्रात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. दरम्यान, पारनेर वनविभागास या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. कान्हूरपठार-पारनेर रस्त्यावरील मुक्तीधामजवळील सतीश ठुबे यांच्या खाजगी क्षेत्रात अंदाजे सहा महिन्यांचा बिबट्याचा बछडा काही ग्रामस्थांना मृत अवस्थेत आढळला. या प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे, वनरक्षक आकाश कोळे, दादाराम तिकोणे, रमेश घोरपडे आदी दाखल झाले. 

यावेळी मृत बिबट्याची अधिकार्‍यांनी पाहणी केली असता, सुमारे दोन दिवसांपूर्वी काही कारणाने बिबट्या मृत झाला असावा. मृत बिबट्या सडल्याने  शवविच्छेदनासाठी घेऊन जाणे शक्य नसल्याने जागेवरच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात मृत बिबट्या आढळल्याने या परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतात जाणे, रात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी यावेळी सूरज नवले व ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.