Wed, Apr 24, 2019 00:01होमपेज › Ahamadnagar › नागापुरात तोडफोड करून पावणेचार लाख लांबविले

नागापुरात तोडफोड करून पावणेचार लाख लांबविले

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 23 2017 10:59PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जमिनीच्या वादातून तिघांनी घरात घुसून कपाटाची तोडफोड करून सुमारे पावणेचार लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच घराच्या पाठीमागे गेल्यानंतर लाकडी दांडके, लोखंडी गजानेही बेदम मारहाण केली. नागापूर येथील वडगाव गुप्ता बायपास रस्ता येथे गुरुवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी ज्ञानदेव रामभाऊ सप्रे, देवदत्ता ज्ञानदेव सप्रे, महेश सदाशिव सप्रे (सर्व रा. नागापूर, ता. नगर) यांच्याविरुद्ध संगनमताने घरात घुसून चोरी करणे, मारहाण करून गंभीर दुखापत करणे, नुकसान करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत संजय राधाकिसन गव्हाणे (वय 42, रा. वडगाव गुप्ता बायपास रस्ता, नागापूर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जमिनीच्या वादातून गुरुवारी सायंकाळी तीन जण गव्हाणे यांच्या घरात घुसले. त्यांनी घरातील कपाटाची तोडफोड करून त्यातील 3 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच गव्हाणे हे घराच्या पाठीमागे लघुशंकेला गेले असता त्यांच्या हातपायावर लाकडी दांडके, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गव्हाणे हे जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे हे करीत आहेत.