Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Ahamadnagar › कोतकरच्या जामिनावर शुक्रवारी होणार निर्णय

कोतकरच्या जामिनावर शुक्रवारी होणार निर्णय

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 11:41PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 10) निर्णय होणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला आहे.कोतकर याच्याविरुद्ध ‘सीआयडी’ने दोषारोपपत्र दाखल केले आहे. फक्‍त मोबाईलवर संभाषण झालेले आहे. प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यात यावा, अशी मागणी कोतकर याच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. आरोपीचा कटातील सहभाग तपासातून पुढे आलेला आहे. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, जामिनावर शुक्रवार निर्णय होणार आहे, असे आरोपीचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी सांगितले.

या गुन्ह्यात आतापर्यंत 8 जणांविरुद्ध ‘सीआयडी’ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न झालेल्यांपैकी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, औदुंबर कोतकर हे दोघे अजून फरार आहे. माजी महापौर संदीप कोतकर हा सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला गुन्ह्यात वर्ग करू घेण्यात येणार आहे.