Tue, Jul 16, 2019 01:42होमपेज › Ahamadnagar › कोपरगाव आगाराला ‘अ’ प्लसचा दर्जा

कोपरगाव आगाराला ‘अ’ प्लसचा दर्जा

Published On: Jan 04 2018 12:59AM | Last Updated: Jan 03 2018 9:55PM

बुकमार्क करा
कोपरगाव : प्रतिनिधी

कोपरगाव बस आगाराला गेल्या तीन महिन्यांत 1 लाख 62 हजार प्रवाशांची वाहतूक करून 5  कोटी 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्या बद्दल कोपरगाव आगाराचा राज्यातील  250 आगारांतून उत्तम दर्जाच्या 205 आगारांना ‘अ’ प्लस (व्हेरी गुड) दर्जा प्राप्त झाला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर व तारकपूर आगारांचा समावेश आहे. आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली. 

शिर्डी येथे श्री साईबाबा समाधीचे  शताब्दी वर्ष असल्याने  साईभक्तांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एस. टी.प्रशासन सज्ज झाले आहे. शिर्डी येथे जाण्यासाठी कोपरगाव हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. या स्थानकातून 130 बसगाड्या ग्रामीण भागात व 120 गाड्या विविध शहरांना सोडण्यात येतात. त्यांच्या 243 फेर्‍या होतात. या आगाराला दररोज 6 ते 7.50 लाख रुपयांचे उत्पन्न येते. या आगाराला गेल्या तीन महिन्यांत प्रवाशी उत्पन्न वाढ, विद्यार्थांना पास सेवा, गाड्यांचे सरासरी अ‍ॅव्हरेज प्रती किलोमीटर उत्पन्न ,टायरचा खप, प्रवाशी भारमान आदी निकषांवर ‘अ’ प्लस दर्जा प्राप्त झाला असून या आगाराची 91.14 टक्के गुण निकष राहिले आहेत. त्यात 205 डेपोंना ‘अ’ प्लस, 27 डेपोंना ‘ब’ प्लस तर 18 डेपोंना कमी दर्जा ‘सी’ प्लस दर्जा मिळाला आहे. कोपरगाव आगाराने ऑक्टोबर 2016 मध्ये  1 कोटी 64 लाख 12 हजार 950 नोव्हेंबरमध्ये 1 कोटी 74 लाख 8 हजार 171 तर डिसेंबरमध्ये 1 कोटी 97 लाख 9 हजार 955 असे मिळून 5 कोटी 36 लाख 19 हजार 980 रुपयांचे सरासरी उत्पन्न मिळाले. त्यात 1 लाख 62 हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.

 कोपरगाव आगाराला ‘अ’ प्लस दर्जा मिळाल्याने चालक वाहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे. कोपरगाव आगाराला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 3  शिवशाही बस दिल्या असून, त्या कोपरगाव- मुंबई दररोज चालतात, तर एक शिर्ड