Fri, Nov 16, 2018 19:32



होमपेज › Ahamadnagar › धनगर समाजाचा कोपरगावात मोर्चा 

धनगर समाजाचा कोपरगावात मोर्चा 

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 1:12AM



कोपरगाव : प्रतिनिधी

कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समाजाच्यावतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्यांचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील धनगर समाजातील बांधवांनी शहरातून मोर्चा काढला होता. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

यावेळी विजय वहाडणे, शरद खरात, संजय कांबळे, प्रकाश करडे, शिवाजी कवडे, दीपक कांदळकर, योगेश नरोडे, रमेश टिक्कल, राजेंद्र टिक्कल, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे प्रभाकर शिंदे,सचिन कोळपे यांच्यासह समाज बांधवाची भाषणे झाली. 

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यावे, काळानुरूप बंद पडत असलेल्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला राखीव कुरण मिळावे, आंदोलनांमधील धनगर आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेणे, आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या धनगर बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रभाकर शिंदे,राजेंद्र नावडकर, किरण थोरात, सचिन कोळपे, जालिंदर चितळकर, विलास कोळपे बाबासाहेब पानसरे, अशोक काकडे, आशिष वाघमारे सह्या आहेत.