Thu, Apr 25, 2019 03:35होमपेज › Ahamadnagar › शौचालय नसल्याने सरपंच खरात यांचे पद रद्द

शौचालयामुळे ‘या’ गावात होणार पोटनिवडणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा येथील मंगल अनिल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद व सरपंचपद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिला आहे.

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्यास त्यांचे पद रद्द होते. असे असतानाही अनेक सदस्य व पदाधिकार्‍यांकडे शौचालये नाहीत. कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कारभारी पारखे यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावनी झाली. यावेळी ग्रामसेवकांची साक्ष घेण्यात आली.

तसेच कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी महाजन यांनी खरात यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केले.ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई नाथा वाघमोडे व  मंगल गोरख जगधने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे 7 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील 3 जणांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोडनिवडणुकीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.