Fri, Apr 19, 2019 12:21होमपेज › Ahamadnagar › ‘कर्जतमध्ये सर्वांना घरे मिळणार’

कर्जतमध्ये सर्वांना घरे मिळणार

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:39PM

बुकमार्क करा
कर्जत : प्रतिनिधी

कर्जत शहरात सर्व नागरिकांना घरे मिळणार, असे प्रतिपादन नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले. कर्जत नगर पंचायतीच्या वतीने आज प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ नगराध्यक्षांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके, नगरसेवक अनिल गदादे, नगरसेविका मंगलताई तोडमल, बांधकामच्या सभापती वृषाली पाटील, हर्षदा काळदाते, नीता कचरे, नगरसेवक सुधाकर समुद्र, लाला शेळके, तारेक सय्यद, नाना कचरे, नितीन तोरडमल, सचिन सोनमाळी, डॉ. बरबडे, सतिश समुद्र, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, विलास शिंदे, बापू उकिरडे, गोकूळ पवार, हे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

नगराध्यक्ष राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गरीब व्यक्तीस घर नाही, त्याला सन 2022 पर्यंत घर देण्याची योजना सुरू केली आहे. सुरवातील मोठ्या शहरांमध्ये असलेली ही योजना आता नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्येही लागू करण्यात आली आहे. आपणही या योजनेची शहरामध्ये चांगली अंमलबजावणी करणार आहोत. त्यासाठी आजपासून येथे नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थेमार्फत घरे नसलेले किंवा अर्धे पक्के, झोपडपट्टी धारकांची नोंदणी सुरू केली आहे. आज येथे आलेल्या काही नागरिकांची नोंदणीही केली आहे. अशी नोंदणी सर्वानी करून घ्यावी आणि आपल्या स्वप्नातील घर तयार करावे. यावेळी उपनगराध्यक्ष बापुसाहेब नेटके आणि बांधकामच्या सभापती वृषाली पाटील यांनी सर्व नागरिकांनी विहित नमुण्यात अर्ज भरून तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन केले.