Wed, May 23, 2018 09:02होमपेज › Ahamadnagar › महाराज पडल्याने चुकला प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

महाराज पडल्याने चुकला काळजाचा ठोका

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 14 2018 2:49AMकर्जत : प्रतिनिधी

नरशार्दूल संभाजी महाराज महानाट्य सुरू असताना संभाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते हर्षल सुर्वे घोड्यासह खाली कोसळले. मात्र क्षणाचीही उसंत न घेता तेवढ्याच तडफेने ते उभे राहून पुन्हा घोड्यावर स्वार झाले. मात्र या प्रसंगामुळे सर्व कलाकार व प्रेक्षकांच्या छातीचा ठोका चुकला होता. कर्जत येथे नरशार्दूल छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचे तीन दिवस प्रयोग झाले. या तिन्ही प्रयोगांस नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काल प्रयोग सुरू असताना संभाजी महाराज पोर्तुगिजांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करत होते. त्याच वेळी संभाजी महाराजांचा घोडा खाली कोसळला.

त्यामुळे संभाजी महाराजही खाली पडले. मात्र अवघ्या काही सेकंदात ते उभे राहिले व त्याच चपळाईने घोड्यावर स्वार होऊन पुन्हा पाठलाग सुरू केला. वास्तविक पाहता घोडा खाली पडणे हा प्रसंग प्रत्यक्षात नाही. मात्र हा प्रसंग घडल्याने  स्टेजवरील कलाकार व प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र क्षणाचाही विलंब न करता सुर्वे घोड्यावर स्वार होतात. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट होतो. मात्र हा प्रसंग चांगलाच जीवघेणा झाला होता, अशी चर्चा नाटक संपल्यावर सुरू होती.

मात्र सुर्वे यांनी हा प्रसंग एवढ्या सहजतेने घेतला व अंगातील कसब वापरून तो प्रसंग जीवंत केला. मात्र उपस्थित 10 हजार प्रेक्षकांच्या हे लक्षातही आले नाही. मात्र या अपघातातून सुर्वे मात्र बचावले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले,  या प्रयोगातील घोडे नवीन असतात.त्यावर स्वार होणे तसे सोपे नसते. त्यामुळे असे प्रसंग घडू शकतात. मात्र आई भवानीच्या आशीर्वादामुळे सर्व काही  ठीक होत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.