Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › अंजली तेंडुलकरांकडून करंजीला 20 लाख

अंजली तेंडुलकरांकडून करंजीला 20 लाख

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:10PMकरंजी : वार्ताहर

फळभाज्यांवर होणारा रासायनिक खतांचा वाढताप्रभाव, यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेंद्रीयशेती करण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतीसाठी मी स्वतः शेतकर्‍यांना मदत करील, असे प्रतिपादन मास्टर ब्लास्टर खा. सचिन तेंडुलकर यांची पत्नी डॉ. अंजली तेंडूलकर यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या सेंद्रीय शेतीची पहाणी करण्यासाठी अंजली तेंडूलकर यांनी करंजी गावाला भेट दिली. तेंडूलकर यांचा करंजी गावाला येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील त्यांनी करंजी येथील शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या सेंद्रीय शेतीची पहाणी केली होती. सेंद्रीय शेतीच्या अभ्यासक कलीया चांदमल व मायकल अलेक्स यांनी मावसबहीण असलेल्या तेंडूलकर यांना करंजी गावाला भेट देण्याची विनंती केली होती. काल दुपारी तेंडूलकर यांनी करंजी गावाला दुसर्‍यांदा भेट दिली. 

यावेळी करंजी गावच्या सरपंच नसीम शेख, माजी सरपंच संध्या साखरे, कविता आव्हाड यांनी तेंडूलकर यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना तेंडूलकर म्हणाल्या, करंजी गावासाठी खा. सचिन तेंडूलकर यांनी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, यापुढे देखील करंजी गावाला खा. तेंडूलकर यांच्या माध्यमातून भरीव निधी देऊ. करंजी येथील शेतकर्‍यांनी सुरू केलेला सेंद्रीय शेतीचा उपक्रम निश्‍चितच प्रेरणादायी असून, प्रत्येक शेतकर्‍याने शेंद्रीयशेती करावी. त्यासाठी आपण सर्वतो मदत करणार असून, मी शेंद्रीय शेती विषयीची माहिती घेत आहे. तेंडूलकर यांनी शेतकरी महादेव गाडेकर, सुरेश क्षेत्रे, सखाराम क्षेत्रे यांच्या शेतीची पहाणी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रफीक शेख, माजी सरपंच सुनील साखरे, सुभाषराव अकोलकर, उपसरपंच शरदराव अकोलकर, छगनराव क्षेत्रे, तनवीर शेख, गजानन गायकवाड, जहांगीर मनियार, डॉ. मच्छिंद्र गाडेकर, भानुदास अकोलकर, राजेंद्र मुरडे, सचिन अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.