Tue, Mar 26, 2019 20:15होमपेज › Ahamadnagar › पुलाला काकासाहेब शिंदेंचे नाव!

पुलाला काकासाहेब शिंदेंचे नाव!

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 12:47AMनेवासा : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथील आंदोलनात पाण्यात बुडून मृत झालेल्या काकासाहेब शिंदे यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. या पुलाचे ‘हुतात्मा स्वर्गीय काकासाहेब शिंदे सेतु’, असे नामकरण त्याच्या समर्थकांनी केले. 

कायगाव टोका येथे मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे यांनी या पुलावरून पाण्यात उडी घेऊन जीव दिला. त्यानंतर राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळले. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण लागले आहे. शिंदे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने बुधवारी कायगाव टोका पुलावरील वाहतूक बंद ठेवून, ती अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. 

तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दशक्रिया विधी उरकल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.  दरम्यान, शिंदे यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम शांततेत पार पडला.  यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी कायगाव टोका या पुलाचे ‘हुतात्मा स्वर्गीय काकासाहेब शिंदे सेतु’, असे नामकरण केले.