Fri, Jun 05, 2020 15:17
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पत्रकाराची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

पत्रकाराची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

Published On: Aug 14 2019 3:43PM | Last Updated: Aug 14 2019 3:43PM

संग्रहित छायाचित्रनगर : पुढारी ऑनलाईन

दैनिक भास्करचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दारुणकर गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. 

मंगळवारी दुपारी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज खाली गोवा एक्सप्रेसखाली उडी मारत त्यांनी आत्महत्या केली. तोंडावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दारूणकर त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.