Mon, Aug 19, 2019 07:46होमपेज › Ahamadnagar › महिला आयोगाची जनसुनावणी

महिला आयोगाची जनसुनावणी

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 10:17PMनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत  नगर जिल्हयातील जनसुनावणी आज (दि.12) महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.  तसेच कारभारणी प्रशिक्षण अभियानाचे उदघाटन देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे.

महिलांच्या  सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना न्याय मिळावा, यासाठी ‘महिला आयोग, आपल्या दारी’  हा उपक्रम  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभागस्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमास पोलिस प्रशासन, विधी सल्‍लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदींची उपस्थिती असते. ग्रामीण भागातील  महिलांना  मुंबई येथील कार्यालयात येऊन तक्रार करणे व  सुनावणीसाठी  उपस्थित रहाणे आर्थिकदृष्टया तसेच इतर कारणांमुळे  शक्य होत नाही.  

त्यामुळेे आयोगाने जिल्हास्तरावर जनसुनावणी कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हयातील आयोगाकडे दाखल असलेल्या तक्रारीवर सुनावणी त्याचबरोबर नव्याने आलेल्या तक्रारीवर ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार आज (दि.12) सबजेल चौकातील जिल्हा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृहात दुपारी 12 वाजता जनसुनावणी आयोजित केली आहे. 

कारभारणी प्रशिक्षण 

पंचायतीमध्ये निवडून आलेल्या महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला, लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरावर गुरुवारी (दि.12) नगर पंचायत समिती सभागृहात सकाळी 10 वाजता एक दिवशीय कारभारणी प्रशिक्षण अभियान आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उदघाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे हस्ते होणार आहे. नगर येथील स्नेहालय संस्थेने मुलींच्या  शिक्षणासाठी  राबविलेल्या ‘शिकवा समक्ष करा,  नेतृत्व कौशल्य वाढवा’ या अभियानाच्या समारोप सायंकाळी 5 वाजता  स्नेहालय संस्थेत अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.