Thu, Jun 20, 2019 06:49होमपेज › Ahamadnagar › तपास सीआयडीकडे वर्ग

तपास सीआयडीकडे वर्ग

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 11:57PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. याबाबत आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांच्यावतीने विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्रभात कुमार यांनी काल (दि. 16) सायंकाळी जिल्हा पोलिस प्रशासनाला पाठविला आहे.या आदेशात गुन्ह्याची संपूर्ण कागदपत्रे नगरच्या पोलिस अधीक्षकांकडून तातडीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास वेगात करून त्याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयास सादर करावा, असे ‘सीआयडी’च्या अपर पोलिस महासंचालकांना कळविण्यात आलेले आहे. तसेच गुन्ह्याची संपूर्ण मूळ कागदपत्रे केसडायरीसह ‘सीआयडी’च्या ताब्यात देण्याचे आदेश नगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. हा गुन्हा गंभीर व राजकीय स्वरुपाचा असल्याने ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, काल (दि. 16) दुपारी मंगळवारीचे नियुक्त केलेले ‘एसआयटी’चे प्रमुख मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे नगरला दाखल झाले होती. त्यांनी ‘एसआयटी’तील अधिकार्‍यांची बैठक घेऊन गुन्ह्याच्या तपासाचा आढावा घेतला.

या बैठकीस सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे हे अधिकारी उपस्थित होते. सायंकाळपर्यंत बैठक घेऊन त्यांनी तपासाचा आढावा घेतला. मात्र, रात्री उशिरा हा तपासच ‘सीआयडी’ंचे वर्ग झाल्यचा आदेश पोलिसांना प्राप्त झाला. दरम्यान, पोलिस कोठडीत असलेला भानुदास कोतकर हा प्रकृती बिघडल्याचे पोलिसांना सांगत होता. त्यामुळे बुधवारी (दि. 16) त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोतकर याची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत कोतकर हा केडगाव हत्याकांडापूर्वी सुनेसोबत भ्रमणध्वनीवरून बोलणे झाल्याचे मान्य करीत आहे. मात्र, खुनाशी संबंध नाही. वादाबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते, असे सांगत आहे. त्या म्हणण्यावर तो अजून ठाम आहे.     

गुंजाळ दुसर्‍यासोबत आला होता

केडगाव हत्याकांडाच्या काही दिवस अगोदर संदीप गुंजाळ याची शिरूर येथे भेट झाली होती. ती भेट ही त्याच्याशी खास नव्हती, तर एक व्यक्ती भेटण्यासाठी आला होता. त्या व्यक्तीसोबत गुंजाळ होता, असे पोलिस कोठडीत असलेला भानुदास कोतकर हा पोलिसांना सांगत आहे.