Mon, Nov 19, 2018 18:55होमपेज › Ahamadnagar › शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करा

शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करा

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 23 2017 11:02PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीपासून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी वंचित आहेत. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करूनही विद्यार्थी वंचित राहिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम. एस.) ही आठवी ते बारावीचे शिक्षण घेणार्‍या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. 2011 ते 2017 या कालावधीत अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.त्यांना शिक्षण घेताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही योजना राबविण्यात घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.