Sun, Jan 20, 2019 16:27होमपेज › Ahamadnagar › सरकारी कामात अडथळा, ७० हजार रुपयांचा दंड

सरकारी कामात अडथळा, ७० हजार रुपयांचा दंड

Published On: Apr 27 2018 12:51AM | Last Updated: Apr 26 2018 11:07PMनगर : प्रतिनिधी

सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केडगावच्या दोघा आरोपींना 7 दिवसांची साधी कैद व प्रत्येकी 35 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस.व्हि.माने यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 

एसटी बस चालक पृथ्वीराज नारायण थोरात हे त्यांच्या ताब्यातील बस मधील प्रवासी हे कायनेटीक चौकात उतरवीत असताना इंडिका कार (एम.एच 16 ए.जे. 4093) मधून आलेल्या किरण वामन पटेकर व मंदार कृष्णनाथ पवळ ( दोघे रा. केडगाव) यांनी गाडी रस्त्यात का उभी केली? असे म्हणून शिवीगाळ करत हाताने एसटीची काच फोडली.

तसेच लोखंडी रॉडने थोरात यांना मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला न्या. माने यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये आरोपींना दोघी धरण्यात येऊन 7 दिवसांची साधी कैद व प्रत्येकी 35 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्‍त सरकारी वकिल केदार गोविंद केसकर यांनी कामकाज पाहिले.