Tue, Jul 16, 2019 00:08होमपेज › Ahamadnagar › अन्नधान्य उत्पादनात भारत सक्षम

अन्नधान्य उत्पादनात भारत सक्षम

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 12:24AMकोपरगाव : प्रतिनिधी

भारत हा कृषिप्रधान देश असून अन्नधान्य उत्पादनात भारत हा निर्यातीबाबतही सक्षम ठरत आहे. गेल्या 50 वर्षांपूर्वी आपल्याला अन्नधान्य आयात करावे लागत होते. भारताची लोकसंख्या 125 कोटींच्या पुढे गेली असूनही अन्नधान्य उत्पादन वाढ होण्यासाठी कृषी शास्रज्ञांचे  नवनवीन प्रयत्न सुरू असतात, ही भूषणावह बाब आहे. कीटकनाशक व पेस्ट्रिसाईडच्या जुन्या परवानाधारकांचे परवाने यापुढे सुरू ठेवण्याचे विचाराधीन आहे. कृषीक्षेत्रातील विविध असलेल्या समस्या समोरासमोर बसून सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिलेकोपरगाव येथे झालेल्या अ‍ॅग्रो इनपूट डीलर असोसिएशनच्या पहिल्या महाअधिवेशन मेळाव्यात ना. रुपाला बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर रसी सीडसचे अध्यक्ष एम. रामास्वामी, एन. एस. एल. ग्रुपचे अध्यक्ष एम प्रभाकरराव, एफ. एम. सीचे वाणिज्य संचालक एस.एन श्रीनिवास, खासदार रामचंद्रन बोहरा, जयपूरचे आमदार मोहनलाल गुप्ता, शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम खंडेलवाल आदी उपस्थित होते. 
ना. रुपाला म्हणाले की, कीटकनाशक व्यापार्‍यांनी हस्तलिखित स्टॉक न ठेवता तो संगणकावर घेतल्यास तो ग्राह्य धरला जाईल. तसेच कीटकनाशकाचा नवीन परवाना घेण्यासाठी बी. एस्सी अ‍ॅग्री पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, जुन्या परवानाधारकांच्या मागणी नुसार त्यांचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी एखादा क्रॅश कोर्स काढण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. 

केंद्र सरकार कीटकनाशक व्यापार्‍यांच्या कायम सोबत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार व संघटनेचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेतून मार्ग काढू.रासायनिक खतांबरोबरची लिंकिंग होत होती ती यापुढे होणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सन 2022 पर्यंत केंद्र सरकारचे उद्दिष्ट देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीचा आहे त्यांचे उत्पादन दुप्पट करणे, तसेच उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल यावर केंद्र सरकारचे लक्ष असून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी अ‍ॅग्रो इनपूट असोसिएशनने देखील सहकार्य करावे. कीटकनाशके व्यापार्‍याला नवीन परवाना काढताना एकादाच 7500 रुपये द्यावे लागतील. मात्र, परवना नूतनीकरणाच्या वेळी ही रक्कम पुन्हा भरावी लागणार नाही, असा खुलासा ही त्यांनी यावेळी केला.

गोबल वॉर्मिंगमुळे महाराष्ट्रातील आंबा उत्पादन घटत चालले आहे. देशभरात कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा समजून त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढकार घेतला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय ठेवून मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देशात व विविध राज्यांत नवीन संकल्पनेद्वारे कामे करीत आहोत. मागील दोन वर्षांत कीटकनाशक अधिनियम संशोधनासाठी दोनवेळा बदल करण्यात आला होता. आता त्याची वेळेची मर्यादा वाढविण्यात आली असून, ती 31 जानेवारी 2019 करण्यात आली असल्याचे रुपाला यांनी सांगितले. 

राजस्थान राज्यात कीटकनाशक लायसन विरोधात अनिश्चित उपोषण करणायत आले होते. मात्र, त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोहनलाल गुप्ता, रामचरण बोहरा यांची भाषणे झाली. महाराष्ट्र राज्याचे माफदाचे अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी स्वागत केले. खजिनदार आबासाहेब भोकरे यांनी प्रास्ताविक केले. शलाका भेंडे यांनी सूत्रसंचालन, तर अरविंद पटेल यांनी आभार मारले.

Tags : Ahmadnagar, India, enabled, food, production