Mon, Jun 17, 2019 14:50होमपेज › Ahamadnagar › मोबाईल अ‍ॅप उपक्रम कौतुकास्पद

मोबाईल अ‍ॅप उपक्रम कौतुकास्पद

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:47PMनगर : प्रतिनिधी

महापौरांनी तयार केलेला स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप शिवसेनेसाठी दिशादर्शक आहे. या अ‍ॅपमध्ये फक्त कामांच्या तक्रारीच नव्हे, तर विविध विकासकामांचाही समावेश करण्यात आला आहे. संघटनेच्या दृष्टीने हा अ‍ॅप महत्त्वपूर्ण असून, नगरकरांना पर्वणी आहे. अ‍ॅपचा उपक्रम हा खरोखरच कौतुकस्पद आहे, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले.

महापौर सुरेखा कदम यांनी तयार केलेल्या अ‍ॅपचे उद्घाटन काल कोरगांवकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपमहापौर अनिल बोरुडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, गणेश कवडे, संभाजी कदम, विक्रम राठोड, योगिराज गाडे, नगरसेविका मनिषा बारस्कर,आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिल राठोड म्हणाले की, आज प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या अ‍ॅपचा नगरवासियांना मोठा फायदा होणार आहे. आपल्या तक्रारी ते या अ‍ॅपद्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकतात. या अ‍ॅपमुळे जनतेच्या विविध प्रश्‍नांना वाचा फुटेल व त्यांचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागतील. यावेळी महापौर कदम म्हणाल्या की, शहरातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, जनतेला वेळेत अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली जावी व त्यावेळेत मार्गी लागव्यात, यासाठीच हा अ‍ॅप विकासित करण्यात आला आहे. नगरकरांनी या अ‍ॅपचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.