होमपेज › Ahamadnagar › आंबेगाव, जुन्नरला बिबट्याचे वाढते हल्ले

आंबेगाव, जुन्नरला बिबट्याचे वाढते हल्ले

Published On: May 03 2018 1:27AM | Last Updated: May 02 2018 11:48PMनारायणगाव : प्रतिनिधी

रात्री 8 ची वेळ आई व मुलगा मोटारसायकल वरून पाहुण्याच्या घरी जात असताना बिबट्या गाडीसमोर उडी मारतो बिबट्याची गाडीला धडक बसून गाडीवरील मायलेक जमिनीवर पडून जखमी होतात नशीब बलवत्तर म्हणून वाचलो असल्याची प्रतिक्रिया मायलेक करतात ही घटना 1 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान येंधे हिवर(ता.जुन्नर) जवळील ओढ्यानजीक घडली.

सुरेखा अंकुश कवडे(वय 43), व प्रसाद अंकुश कवडे (वय17 रा. सहकार नगर रोड ओझर) हे या घटनेत जखमी झाले आहेत.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आई सुरेखा व मुलगा प्रसाद हे त्यांच्या नातेवाईकांकडे येंंधे हिवरे या ठिकाणी जेवणासाठी मोटारसायकल वर चालले होते ;त्यांच्या अगोदर त्यांचे वडील अंकुश कवडे हे पुढे गेले होते या रस्त्यावरून जाताना ओढ्याजवळ बिबट्याने रस्त्या ओलांडण्यासाठी उडी मारली त्याचा धक्का मोटारसायकलला लागला यामुळे प्रसाद घाबरला त्याच्याकडून गाडीचा तोल जाऊन दोन्ही माय लेक गाडीवरून पडले या घटनेत प्रसादच्या हातापायाला व आई सुरेखा यांना दुखापत झाली त्यांच्या मागून येणार्‍या लोकांनी हा प्रकार पाहून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच वनपाल मनीषा काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात गळीत हंगाम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात ऊसतोड चालू असल्यामुळे बिबट्याचे लपन क्षेत्र कमी होत आहे त्यामुळे नागरिकांनी पहाटे व रात्री हातात बॅटरी व काठी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान या भागात काही महिन्यांपूर्वी बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला होता याच भागात उसतोडणी कामगार महिलेवर हल्ला केल्यामुळे तिला जीव गमवावा लागला तर तीन चार दिवसांपूर्वी तेजेवाडी फाट्यावर दोन पारडाचा बिबट्याने फडशा पाडला आणि आता घडलेली ही घटना यामुळे येथील राहिवाशी घाबरले असून वन विभागाने तत्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.