Sun, May 19, 2019 22:43होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचवावी

शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती उंचवावी

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:22PM

बुकमार्क करा
कोळपेवाडी : वार्ताहर

आपला देश कृषी प्रधान देश आहे. कृषी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असून, शेतकरी सुखी असेल, तरच समाजातील सर्व घटक सुखी असतात. मागील काही वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादित केलेल्या शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात नैराश्याचे वातावरण असून ही परिस्थिती बदलण्यासाठी व शेतकर्‍यांचे आर्थिक राहणीमान उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत माजी आ. अशोकराव काळे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील पढेगाव, शिरसगाव, सावळगाव येथील शेतकर्‍यांशी संवाद साधताना केली काळे बोलत होते. यावेळी काळे कारखान्याचे माजी संचालक कारभारी आगवण, भगवानराव माळी, बाळासाहेब बारहाते, गौतम बँकेचे माजी संचालक भानुदास शिंदे, रंगनाथ मलिक, माधवराव खिलारी उपस्थित होते.

काळे म्हणाले की, शेतकर्‍यांपुढे ज्या प्रकारच्या अडचणी आहेत अशाच अडचणी सहकारी साखर कारखानदारीपुढेही आहे. साखरेचे दर टिकून राहिल्यास शेतकर्‍यांच्या उसाला जादा भाव दिला जाऊ शकतो. पण साखरेचे दरच जर कमी झाले, तर एफ. आर. पी. च्या चौकटीत राहून शेतकर्‍यांना उसाला दर देताना व्यवस्थापनाची तारांबळ उडते.