Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Ahamadnagar › कोर्ट कामकाज न करता वकिलांनी केला निषेध

कोर्ट कामकाज न करता वकिलांनी केला निषेध

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 12:20AMश्रीरामपूर/राहाता : प्रतिनिधी

न्यायालयीन कामाकरिता आवश्यक असलेल्या कोर्ट फी स्टॅम्प मध्ये पाचपटीने वाढ करण्याचा शासन निर्णयाचा निषेध करीत वकिलांनी काल कोर्ट कामकाज बंद ठेवले. सदरचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी श्रीरामपूर व राहाता तालुका बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

यासंदर्भात राहाता तालुका  बार असोसिएशनच्या या निर्णयाचा निषेध म्हणून काल न्यायालयाचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले असल्याची  माहिती बार असोसिएशनच्या वतीने सहसचिव अ‍ॅड. नितीन विखे यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना श्रीरामपूर बार असो. चे उपाध्यक्ष नंदकीशोर मुखेडकर व राहात्याचे सहसचिव अ‍ॅड. नितीन विखे म्हणाले की, साधा मुदतीचा अर्ज दाखल करताना आता पाच ऐवजी पन्नास रुपयांचे तिकीट लावावे लागेल. 

शासनाचा हा निर्णय सामान्य माणसावर अन्याय करणारा आहे. शासनाने न्याय महाग केला हीच भावना प्रत्येकाची झाल्याने सदर निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा आशी मागणी वकील संघाची आहे. या मागणीसाठी  जिल्ह्यातील इतर तालुक्यातील वकील संघाशी चर्चा करण्यात आली असून, निर्णय मागे घ्यावा  याकरिता वकील संघ संघटीतपणे लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.