होमपेज › Ahamadnagar › नदीत आले तर कोयत्याने तोडू..!

नदीत आले तर कोयत्याने तोडू..!

Published On: Apr 13 2018 1:13AM | Last Updated: Apr 12 2018 11:11PMराहुरी : प्रतिनिधी

रागाव नांदूर शिवारातील मुळा नदीपात्रात वाळू लिलावाचा ठेका घेतल्यानंतर परिसरातील काही वाळूतस्करांकडून ठेकेदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, नदीत आले, तर कोयत्याने तोडू, अशी ठेकेदाराला धमकी देणार्‍या त्या चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बारागाव नांदूर गावात गेल्या अनेक वर्षांपासून वाळूतस्करांनी दहशत निर्माण केली आहे. रात्रंदिवस वाळू उपसा करून सरकारची कोट्यवधी रुपयांची लूट संबंधित वाळू तस्करांकडून झाली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बारागाव नांदूर येथील नदीपात्रात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू होती. सरकारची होणारी लूट पाहता बारागाव नांदूर ग्रामस्थ व महसूल प्रशासनाच्या सहयोगाने मुळा नदीपात्रातील वाळूचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महसूल विभागाने पुकारलेला ठेका 8 ते 10 वाळू ठेकेदारांनी एकत्र येत घेतला असतानाच बारागाव नांदूर गावात चोरटी वाळू वाहतूक करणार्‍यांकडून ठेकेदारांना कोंडीत पकडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. नदीपात्र म्हणजे आमचीच मालमत्ता असल्याचे भासवून काही वाळूतस्कर ठेकेदारांना ठेका रद्द करण्यासाठी दबाव निर्माण करीत आहे. दरम्यान, याबाबत बारागाव नांदूर येथे ठेकेदारांकडून नदीपात्रातून रस्ता बनविण्याचे कार्य केले जात असताना सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी व इतर 2 जणांनी ठेकेदाराला दमदाटी केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

सुभाष माळी, किशोर माळी व इतर दोघांनी एकनाथ बर्डे, मुज्जू पटेल, राजू माळी, अशोक माळी यांना दम देत नदी आमची आहे, तुम्ही ठेका कसा घेतला? असे विचारत आमच्या नादी लागलात, तर कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रसंगी गावातील  50 ते 60 युवकांनी एकत्र येत ठेकेदारांमुळे सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होणार असून गावासाठी ग्रामनिधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांना अडचण निर्माण करणार्‍यांवर पोलिस व महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

Tags : Ahmadnagar, across, river, you, murdered