Thu, Jan 17, 2019 03:56होमपेज › Ahamadnagar › तर जातीय दंगली होणार नाही : इंदोरीकर

तर जातीय दंगली होणार नाही : इंदोरीकर

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:20PM

बुकमार्क करा
माळवाडगाव : वार्ताहर

राज्यात शाळांचे पेव फुटले आहे. शाळांतील सुखसोयींचा दर्जा पाहिला जातो अन् शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष होते. शिक्षकांनी मुलांना भारत माझा देश आहे, यावर अर्धा तास उत्कृष्ट शिक्षण दिले, तर आज जातीय दंगली घडवून येणार नाहीत, असा उपदेश समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केला.

श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथील धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. 

इंदोरीकर  म्हणाले, फार अल्पकाळात हे देवस्थान भव्य दिव्य झाले. अरुणनाथगिरी महाराज यांचे प्रारब्ध अन् सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची कृपा आहे. नारायणगिरी महाराज हे चालतं बोलतं ब्रह्म होत. साधूंकडे बाह्यअंगाने न पाहता अंतरंगाने पाहा. आपापले कर्म करुन जो भजन करतो तो भगवंताला प्राणापेक्षाही प्रिय असतो, असे माऊलीने म्हटले आहे.

आज शेती व्यवसाय डबघाईस आला असला तरी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत, असे इंदोरीकर म्हणाले. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सभापती दीपकराव पटारे, सरपंच बाबासाहेब चिडे,  बाबासाहेब काळे, सरपंच रामहरी थोरात  आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.