Sat, Jul 20, 2019 15:26होमपेज › Ahamadnagar › बोंडअळीचा दीड लाख हेक्टरला फटका                 

बोंडअळीचा दीड लाख हेक्टरला फटका                 

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:57AMनगर : प्रतिनिधी

कापसाच्या नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने नुकताच शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 42 हजार 735 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 1 हजार 85 गावातील 1 लाख 97 हजार 342 शेतकर्‍यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. एकूण बाधित क्षेत्रासाठी 157 कोटी 23 लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठीआवश्यक असल्याचे शासनाला कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर कपाशीची लागवड झाली होती. त्यापैकी सुमारे 90 टक्के क्षेत्राला बोंडअळीने फटका दिला आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, जामखेड आणि कोपरगाव परिसरात कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. शेवगाव, पाथर्डी, नेवासा हे तालुके कॉटन बेल्ट म्हणून ओळखले जात आहेत. यंदा कपाशीचे पीक जोमात होते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मात्र कापसाचे मोठे नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचे  पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यातील 1 लाख 50  हजार 379 हेक्टर क्षेत्रापैकी  तब्बल 1 लाख 42 हजार 735 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. 

शासनाने बाधित जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 6 हजार 800 रुपये तर बागायतीसाठी 13 हजार 500 रुपये अनुदान घोषित केले आहे.त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी 69 कोटी 60 हजार तर बागायती क्षेत्रासाठी 87 कोटी 93 लाख असे एकूण 157 कोटी 23 लाख 148 रुपये निधीची आवश्यकता आहे. असा अहवाल देखील जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. 

बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये  

नगर3445, पारनेर157, पाथर्डी36131, संगमनेर 1035, कोपरगाव  4649,  राहाता 929, श्रीरामपूर 4321, नेवासा 21906, राहुरी 10222, शेवगाव 47192, कर्जत 6336, श्रीगोंदा 2806, जामखेड 3602.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या 

नगर 4135,पारनेर 267, पाथर्डी 47192, संगमनेर 2510, कोपरगाव 7013,राहाता 1629, श्रीरामपूर 6133,नेवासा 32859, राहुरी 16485, शेवगाव-57505, कर्जत 10470,श्रीगोंदा 4847, जामखेड 6217.