Sun, Nov 18, 2018 13:24होमपेज › Ahamadnagar › शंभर शिवसैनिक करणार मरणोत्तर देहदान

शंभर शिवसैनिक करणार मरणोत्तर देहदान

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 24 2018 11:59PMसाकूर : वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभाग शिवसेना व युवासेनेच्या वतीने  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मरणोत्तर देहदान व रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात 100 शिवसैनिकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.

यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मानवंदना करून शिवसैनिकांनी अभिवादन  केले. या शिबिराचे आयोजन  शिवसेना उपतालुकाध्यक्ष संदीप खिलारी  तर युवा सेना उपतालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केले. या शिबिरात पठार भागातील  साकूर, बिरेवाडी, कौठे मलकापूर, शिंदोडी, मांडवे, रणखांब, जांभूळवाडी, हिवरगाव पठार, दरेवाडी, खंडेरायवाडी आदी गावातील शिवसैनिकांनी हजेरी लावली. यावेळी जवळपास 100 शिवसैनिकांनी  मरणोत्तर देहदान तर 40 शिवसैनिकांनी रक्तदान केले. 

मरणोत्तर देहदान व रक्तदान शिबिरासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शरीर शास्त्र विभागाचे पथक उपस्थित होते. शिबीरात मरणोत्तर देहदानासाठी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच देहदान विषयी शरीर शास्त्र विभागाचे डॉ. सुधीर पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख अमर कतारी, लालू शेख, सरपंच उज्ज्वला गुळवे,  बुवाजी खेमनर, बाळासाहेब खेमनर आदी उपस्थित होते. रक्तदान करणार्‍या शिवसैनिकांना अल्पोहार देण्यात आला.