Tue, Jul 23, 2019 11:35होमपेज › Ahamadnagar › विनाअनुदानित शिक्षकांची झेडपीत ‘बोंबाबोंब’!

विनाअनुदानित शिक्षकांची झेडपीत ‘बोंबाबोंब’!

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:37AMनगर : प्रतिनिधी

यावर्षी राज्यात काही विनानुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानित करण्यात आले. त्यामध्ये नगरमधील एकही महाविद्यालयाचा समावेश नसल्याने महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीच्यावतीने, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी करून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात प्रा. संजय बाबर, संजय शेळके, सचिन पालवे, प्रा. सुभाष चिंधे, उमादेवी शेळके, एल. एम. पालवे आदी सहभागी झाले होते. तत्पूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील तेराशे पैकी अवघ्या 146 प्रस्तावांना पात्र ठरविण्यात आले. 
विशेष बाब म्हणजे यामध्ये नगर जिल्ह्यातील एकाही महाविद्यालयाचा समावेश नाही.

विनावेतन काम करणार्‍या शिक्षकांवर हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातील विनानुदानित शिक्षक दहावी,बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत आहेत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागल्यास शासन जबाबदार राहील असेही म्हटले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.