Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Ahamadnagar › खासदार निवासस्थानी पेन्शनधारकांचे धरणे 

खासदार निवासस्थानी पेन्शनधारकांचे धरणे 

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:25PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील ईपीएस 95 च्या अल्प पेन्शनधारकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन खा.गांधी यांना देऊन लोकसभेच्या अधिवेशनात पेन्शनधारकांच्या वतीने बाजू मांडून प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रीय संघर्ष समितीचे समन्वयक व महाराष्ट्र पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाषराव पोखरकर, नारायण होन, संपतराव समिंदर, दिलीप थोरात, साहेबराव वाघ, आशाताई शिंदे, बाळासाहेब चव्हाण, सुधाकर गुरव, मालती कोल्हे, मथुरा सोनवणे, दत्तात्रेय भोईटे, नंदकुमार कदम आदींसह जिल्ह्यातील वीज मंडळ, एस. टी. महामंडळ, साखर उद्योग, विडी उद्योग, सहकारी बँका, सर्व सहकारी संस्था, शेती महामंडळ, फेडरेशन, विविध औद्योगिक संस्था, कारखाने, ट्रस्ट, हॉस्पिटल आदी क्षेत्रातील सेवानिवृत्त पेन्शनधारक सहभागी झाले होते.

ईपीएस पेन्शनधारकांना दरमहा 7500 रु. व त्यावर निगडीत महागाईभत्ता एवढी कमीतकमी पेन्शन मिळावी. अंतिम निर्णय होईपर्यंत हंगामी स्वरुपात कमीत कमी 5000 रु. व महागाई भत्ता एवढी पेन्शन त्वरीत लागू करावी. प्रोव्हिडंट फंड कार्यालयाचे दि.31 मे 2017 चे परिपत्रक रद्द करून सुप्रीम कोर्ट निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी, हायर पेन्शन या सूत्राची अंमलबजावणी करावी. सर्व पेन्शनरांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी. सर्व पात्र पेन्शनरांना दोन वर्षे वॅटचा त्वरित लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.