होमपेज › Ahamadnagar › अंशकालीन निदेशकांना सेवेमध्ये कायम करावे

अंशकालीन निदेशकांना सेवेमध्ये कायम करावे

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMनगर : प्रतिनिधी

अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना सेवेत कायम करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

नागपूर जिल्ह्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशक सत्र 2012-13 पासून व सत्र 2015-16 नुसार तासिका तत्त्वावर काम करणारे आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेद्वारे उच्च न्यायालयाने 9 मे 2014 रोजी निकाल दिला. परंतु, या निकालाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सत्र 2012-13 मधील सध्या कार्यरत असलेल्या अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना सेवेत नियमित करावे, सहावी ते आठवी वर्गाची शंभरची पट रद्द करावी, पहिली ते आठवीपर्यंत वर्गात कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांना तासिका भार देण्यात यावी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन लागू करावे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियुक्ती पत्र मिळावे, प्रतिमहा किमान 25 हजार रूपये वेतन देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.