Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Ahamadnagar › राळेगणसिद्धी माझ्यासाठी तीर्थक्षेत्रच!

राळेगणसिद्धी माझ्यासाठी तीर्थक्षेत्रच!

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:58PMनगर : प्रतिनिधी

राजसत्तेत बसलेले काही जण राळेगणसिद्धीला विसरले आहेत. परंतु, राळेगणसिद्धी माझ्यासाठी सदैव तीर्थक्षेत्र राहील. देशहितासाठी आपण यापुढेही राळेगणसिद्धीला येत राहू, असा उपरोधित शब्दात आपचे नेते व प्रसिद्ध हिंदी कवी कुमार विश्‍वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर असल्याचे संकेत दिले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने नगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात हिंदी कवी संमेलन झाले. कुमार विश्‍वास प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, कवी सुदीप भोला, दिनेश बावरा, ह. भ. प. बद्रीनाथमहाराज तनपुरे, प्रशांत गडाख आदी उपस्थित होते. विश्‍वास यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते गडाख यांच्या जीवनावरील फोटोबायोग्राफीचे प्रकाशन करण्यात आले. कुमार विश्‍वास म्हणाले, राजकारण हे चपलेसारखे असते तर साहित्य पगडीसारखे आहे. समोरच्याने पगडीला हात घातल्यास चप्पल हातात घ्यावी लागते. त्यांनी मला भारतीय राजकारणातील मी कमी वयाचा अडवानी असल्याचे म्हटले आहे.

ताणतणावर भाष्य करताना त्यांनी अमेरिकेतील एकटेपण जाणवलेले आणि आत्मविश्‍वास गमावलेले आत्महत्या करतात. पण भारतात मोकळ्या घराला घरपण देणारी संस्कृती आहे. त्यामुळे येथे एकटेपणा जाणवत नाही. पिझ्झा खाणार्‍यांना भाकरीला लोणी लाऊन खाण्याचा आनंद काय कळणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. ज्येष्ठ नेते गडाख यांचे ‘अर्धविराम’ वाचून रोमांचित झाल्याचे त्यांनी सांगितले. सुदीप भोला यांनी पाहडी आवाजात कविता सादर केल्या. दिनेश बावरा यांनी भूमिपुत्राची वेदना सांगणारी कविता सादर केली. उत्तरोत्तर कवी संमेलनात रंगत वाढत गेली.