Mon, Feb 18, 2019 19:56होमपेज › Ahamadnagar › कर्डिलेंच्या जामिनावर उद्या होणार सुनावणी

कर्डिलेंच्या जामिनावर उद्या होणार सुनावणी

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:41AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाचजणांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले आहेत. त्यावर उद्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भिलारे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

आ. कर्डिले यांच्यासह अ‍ॅड. प्रसन्न जोशी, अ‍ॅड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा या पाचजणांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी लेखी म्हणणे सादर केलेले आहे. त्या अर्जावर शनिवारी दुपारी सुनावणी ठेवण्यात आली होती. 

सरकारी वकील व आरोपीचे वकील न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले होते. परंतु, इतर न्यायालयीन कामाच्या व्यापामुळे काल न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने या पाचही जणांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी ठेवली आहे.