Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं. कर्मचार्‍यांना मिळणार पगारी रजा

ग्रा.पं. कर्मचार्‍यांना मिळणार पगारी रजा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पगारी रजा देण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाने या मागणीची दखल घेत पगारी रजा मंजूर करण्याचे परिपत्रक काढले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी दिली. 

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना रजा दिल्या जात नव्हत्या. त्यांनी रजा घेतल्यास त्यांच्या पगारातून कपात केली जात होती. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यानुसार रजा संबंधी नियम लागू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. 

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 22 पोटकलम 8, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना रजा देण्याचा आदेश दिला आहे. या परिपत्रकामुळे ग्रामपंचायत कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी यांनाही पगारी रजा मिळणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल संघटनेचे पदाधिकारी संदीप आल्हाट, विष्णू वाघ, संजय डमाळ, संजय शेलार, प्रशांत उपाध्ये आदींनी आभार व्यक्‍त केले आहे. 


  •